पारंपारिक 'घोंगडी' ला आधुनिकतेचा साज!

नीरज बोराटे, तुषार पाखरे या तरुणांनी दिले लुप्त होणाऱ्या घोंगडी ला पुनरुज्जीवन 


तरुण भारत - संवाद. 


महाराष्ट्रातील परंपरेचा महत्वाचा घटक म्हणून घोंगडी ओळखली जाते. प्राचीन काळापासून घोंगडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. घोंगडी विणणे हि कला असून ती काळाच्या ओघात लुप्त होत होती. पारंपारिक घोंगडी विणण्याच्या कलेच्या संवर्धनासाठी नीरज बोराटे आणि तुषार पाखरे यांनी घोंगडीला आधुनिक साज देत घोंगडी कलेला पुनुरुजीवित केले. दुर्मिळ होत चाललेल्या पारंपरिक खड्डामागावर घोंगडी विणणाऱ्या कारागिरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. या दोन तरुणांनी Ghongadi.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घोंगडी देशभर नव्हे तर परदेशात पोहोचवली. 


नीरज स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर तर तुषार कॉम्पुटर इंजिनिअर असून २०१४ मध्ये या दोघांनी हाताने शिवलेल्या गोधडीचा व्यावसाय सुरु केला. त्यानंतर एक वर्ष घोंगडी बाबत संशोधन केले. घोंगडी विणणाऱ्या कारागिरांचा शोध घेतला. सोलापूर जिल्यातील करमाळा तालुक्यातील पाच घोंगडी विणणाऱ्या कारागिरांसोबत काम सुरु केले. आज गोधडी आणि घोंगडी विणणारे असे एकूण ८० कारागीर घोंगडी डॉट कॉमसाठी काम करत आहेत. घोंगडी विणणारे कारागीर हे ६५ ते ७० या वयोगटातले आहेत. या कारागिरांमध्ये आमच्या सोबत काम करण्याबाबत विश्वास निर्माण करणे, त्यांना घोंगडीचेही मार्केटिंग होऊ शकते हे पटवून देणे, घोंगडी विणण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे, आणि ते कारागिरांकडून करून घेणे, नवनवीन डिजाईन त्यांच्याकडून करून घेणे तसेच कमी वेळेत जास्त उत्पादन घेणे अशी अनेक आव्हाने घोंगडी तयार करताना समोर आली, असे नीरज म्हणाले. 


घोंगडीला देशभरातून कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू अशा विविध राज्यातून घोंगडीला मागणी आहे. एवढेच नव्हेतर घोंगडीचे नमुने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ला पाठवले आहेत. अमेरिका, कॅनडामध्ये यापूर्वीच ग्राहकांपर्यंत घोंगडी पोहोचली आहे. घोंगडी आणि गोधडी यांची मिळून सुमारे ५० लाखाची या व्यवसायाची उलाढाल आहे. घोंगडी विणणाऱ्या कारागिरांची अस्तित्वात असलेल्या पिढीला या कलेशी बांधून ठेवणे तसेच हि कला त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश नीरज आणि तुषार यांचा आहे. लोकांकडून घोंगडीच्या उत्पादनाला मागणी वाढली तर ही कला टिकेल. 


4 comments

mallikarjun hunnure

For religious functions Ghongdi is must. Besides it is very useful in winter especially.

Nagnath Ganje

Khup chyan kam karat aahet

अनंत जोशी

माझ्या लहानपणी(१९५६ -१९७०) वाईला (जिल्हा सातारा) असताना घरी खादी ग्रामोद्योगच्या दुकानात वाईच्या धनगर आळीतील घरातून आलेली बहुधा फक्त काळी तसेच पंढरपूर जवळून (कदाचित करमाळा ही असेल) येणारी पांढरी, काळी-पांढरी चेक्स अशा रंगाच्या घोंगडी विकायला असत.आम्ही घरातही अंथरूण आणि थंडीत पांघरून म्हणून घोंगडी वापरायचो.
मध्यंतरी विटा खानापूर जवळून बंधूंनी तुमच्या वेबसाईटवर दाखवली आहेत तशी २ जेन आणून दिली.ती आजही वापरतो. या कलेला उजाळा व त्या सर्व कलाकारांना उर्जितावस्था देण्याचा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.धन्यवाद

veelaas chavaan

somebody tried for best business of ghongadiis online purchases.sleeping ghongadi is best for our health. Try once.I tried for it.very nice experience.

Leave a comment

Please note, comments must be approved before they are published