Black Ghongadi

काळी घोंगडी हि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जमा केलेल्या काळ्या लोकरीपासून तयार होतात. पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी साठी काळी घोंगडी वापरली जाते कारण ती तुलनेत रंगीत घोंगडी पेक्षा जास्त जाड आहे. सर्व धार्मिक विधी साठी, पूजा आणि साधनेसाठी काळी घोंगडी वापरली जाते. घोंगडींना महाराष्ट्रात आध्यात्मिक-सांकृतिक वारसा आहे आणि भक्तिसंप्रदायामधे आज देखील घोंगडीला तितकाच मान आहे. श्री ज्ञानेश्वरी चे पठण असो किंवा संत तुकारामांच्या गाथेचे पारायण, पारंपरिक पध्दतीने घोंगडी वर बसून ग्रंथाचे वाचन केले जाते. भक्ती संप्रदायामध्ये म्हणूनच घोंगडी ला अनन्यसाधारण महत्व आहे. जागरण-गोंधळ व इतर धार्मिक सानासुदिंना घोंगडींवर बसण्याचा मान आहे तसेच साखरपुडा-लग्न ठरवण्याच्या बैठकींना घोंगडींवर बसने प्रतिष्ठित समजले जाते.

पाठदुखी आणि मणक्यांच्या आजारावरी रामबाण उपाय म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात घोंगडी कडे पहिले जाते. रात्रभर घोंगडी वर झोपल्यास पाठदुखीवर विलक्षण आराम मिळतो, शांत झोप लागते आणि शरीर निरोगी राहते.