Color Ghongadi

काळी घोंगडी हि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जमा केलेल्या काळ्या लोकरीपासून तयार होतात तसेच रंगीत घोंगड्या ह्या राजस्थान मधून आम्ही मागवत असलेल्या अत्यंत मऊ लोकरीपासून तयार होतात. आम्ही राजस्थानातून तिथल्या मेंढीची पांढरी शुभ्र लोकर घेवून येतो. या लोकरीला विविध नैसर्गिक रंगात रंगविले जाते आणि त्या त्या रंगानुसार रंगीत घोंगड्या तयार केल्या जातात. जसे कि नारंगी रंगापासून नारंगी रंगाची घोंगडी तासेच हिरव्या रंगापासून हिरवी घोंगडी बनवली जाते. नारंगी (Orange), हिरवी (Green), जांभळी (Lavender) आणि ओरिजिनल पांढर्याशुभ्र (White) रंगात या घोंगड्या उपलब्ध आहेत. 

पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी साठी काळी घोंगडी वापरली जाते कारण ती तुलनेत रंगीत घोंगडी पेक्षा जास्त जाड आहे, आणि रंगीत घोंगडी खड्डामागावर तयार होते. तसेच सर्व धार्मिक विधी साठी, पूजा आणि साधनेसाठी काळी घोंगडी वापरली जाते. रंगीत घोंगडी हि तुलनेत अधिक मऊ असल्याने पांघरण्यासाठी रंगीत अथवा पांढऱ्या घोंगड्या वापरल्या जातात. काही ग्राहकांना मऊ आणि न टोचणार्या घोंगड्या हव्या असल्याने आम्ही रंगीत घोंगड्या बनविल्या आहेत.