सदाबहार कलेक्शन

सदाबहार कलेक्शन मधे ‘सुंबरान’ आणि ‘मल्हार’ ह्या अतिशय दुर्मिळ असणाऱ्या घोंगड्या आम्ही पुन्हा तयार करत आहोत. खड्डामागावर घोंगडी विणण्याची कला हि सर्वार्थाने मराठी मातीतील लोककला आहे आणि तिला असणारा रांगडा धनगरी बाज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही घोंगडी.कॉम च्या माध्यमातून सदाबहार कलेक्शन आपणापुढे घेवून येत आहोत.

अंदाजे 6 किलो वजन असणाऱ्या या दोन्ही घोंगड्या सुतळी इतक्या जाड असणाऱ्या 100% शुद्ध लोकरीच्या धाग्यांपासून बनवल्या जातात. धनगर समाजातील प्रचलित लोककथांमधून मल्हारी मार्तंड देवाच्या खांद्यावर असणारी घोंगडी हि बारा किलोची असायची, त्या प्रकारच्या अस्सल मानाच्या घोंगड्या बनवणारे कलाकार आजमितीला अस्तित्वात नाहीत परंतु या लोककथांच्या संदर्भाचा अभ्यास करून आणि जुन्या-जाणत्या कलाकारांना भेटून आम्ही अगदी तशाच प्रकारच्या घोंगड्या तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. शुद्ध उबदार लोकरीपासून घरगुती वापरता येतील अशा तयार केलेल्या ‘सुंबरान’ आणि ‘मल्हार’ घोंगडी आमच्या या प्रयत्नांचे यश आहे.  

 

 

दुर्मिळ 'मल्हार' आणि 'सुंबरान' घोंगडी