Ghongadicom

Ghongadi

Sale price Price Rs. 1,850.00 Regular price

साईझ: 4x10 फूट

किंमत: 1850₹ मधे घरपोच मोफत डिलिव्हरी 

डिलिव्हरी वेळ - ऑर्डर दिल्यापासून 15 दिवसांत घरपोच मिळेल  

 

घोंगडी विषयी: 

 घोंगडींना महाराष्ट्रात आध्यात्मिक-सांकृतिक वारसा आहे आणि भक्तिसंप्रदायामधे आज देखील घोंगडीला तितकाच मान आहे. श्री ज्ञानेश्वरी चे पठण असो किंवा संत तुकारामांच्या गाथेचे पारायण, पारंपरिक पध्दतीने घोंगडी वर बसून ग्रंथाचे वाचन केले जाते. भक्ती संप्रदायामध्ये म्हणूनच घोंगडी ला अनन्यसाधारण महत्व आहे. जागरण-गोंधळ व इतर धार्मिक सानासुदिंना घोंगडींवर बसण्याचा मान आहे तसेच साखरपुडा-लग्न ठरवण्याच्या बैठकींना घोंगडींवर बसने प्रतिष्ठित समजले जाते.

 पूर्वी कोकणात भात लावणीला पावसापासून वाचण्यासाठी घोंगड्या घोंगता म्हणून डोक्यावर घेतल्या जात असत. खास लांबीला लहान असलेल्या कोकणी पट्टीच्या घोंगड्या कोकणातील शेतकरी वर्गासाठी आमचे कलाकार पिढीजात बनवून पाठवत असत. 

 पाठदुखी आणि मणक्यांच्या आजारावरी रामबाण उपाय म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात घोंगडी कडे पहिले जाते. रात्रभर घोंगडी वर झोपल्यास पाठदुखीवर विलक्षण आराम मिळतो, शांत झोप लागते आणि शरीर निरोगी राहते. गावांमध्ये कामकरी वर्ग, शेतकरी आणि अबाल वृध्द आजदेखील नियमित घोंगडीवर झोपतात. 

 

घोंगडी कशी तयार होते? 

आमचे कलाकार घोंगडी पारंपारिकपणे खड्डा मागावर विणतात. खड्डा मागावर लांबीनुसार सुत लावले जाते. घोंगडी विणताना घोंगडीच्या मधात काळी लोकर, दोन्ही बाजूस पिवळा आणि लाल रंगाच्या लोकरीचे धागे विणले जातात. विणकर एक लय साधत विणायला सुरुवात करतो आणि अंदाजे चार ते पाच दिवसांत घोंगडी विणून पूर्ण करतो. संपूर्ण घोंगडी विणून झाल्यानंतर, सगळ्या घोंगडीला शेवटची खळ लावण्यात येते. या कलाकारांकडे तयार झालेल्या घोंगडी नंतर Ghongadi.com च्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात आणि सर्वोत्तम क्वालिटीच्याच घोंगडी ग्राहकांकडे पाठविल्या जातात.

 

घोंगडी वर झोपल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे:

  • पाठदुखी, मणकेदुखी व कंबरदुखी पासून मुक्ती
  • वात, सांधेदुखी, Spondylosis, Slipped Disc, Arthritis, Spine-Related Problems, CLBP इत्यादी आजारांवर अत्यंत गुणकारी 
  • रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत
  • घोंगडी वर झोपल्याने निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते
  • शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात
  • सकाळी झोपेतून उठल्यानंतर होणाऱ्या अंगदुखी पासून आराम
  • योगा, ध्यानधारणा, बैठक व साधनेच्या सफल पूर्ततेसाठी उपयुक्त
  • तळी-भंडारा, जागरण गोंधळ, सत्यनारायण तसेच विविध वैदिक विधी व कार्यक्रमात घोंगडीला मोलाचा मान

 

 आपण Ghongadi.com मधूनच घोंगडी का घ्यावी?

  • संपूर्णपणे हाताने पारंपारिक पद्धतीने गावांमधे तयार केलेली घोंगडी 
  • उच्च प्रतीची दख्खनी मेंढीची लोकर आम्ही घोंगडी बनवण्यासाठी वापरतो 
  • सर्वोत्तम प्रॉडक्ट क्वालिटी, कोणत्याही प्रकारची लोकरीमध्ये भेसळ नाही 
  • संपूर्ण महाराष्ट्रात खड्डा मागावरील ओरिजिनल घोंगडी देणारा Ghongadi.com हा एकमेव ब्र्यांड 
  • थेट ग्रामीण कलाकार ते ग्राहक, आपण विकत घेत असलेल्या घोंगडी मागील नफ्यातील मोठा हिस्सा हा थेट कलाकारांना दिला जातो 
  • ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक घोंगडी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाते 
  • ग्राहकांच्या वेळेनुसार घरपोच डिलिव्हरी 

 

 पुराणातील घोंगडी:

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा.

 

हि जावळाची घोंगडी आहे का? जावळाची घोंगडी म्हणजे काय?

मेंढी च्या पहिल्या कात्रनीच्या लोकरीला जावळाची लोकर म्हणतात. जावळाची लोकर हि तुलनेत जास्त मऊ असते. परंतु सध्या आम्ही वापरत असलेली लोकर हि अत्यंत चांगल्या प्रतीची असून जावळाच्या लोकरी प्रमाणेच मऊ आहे. तसेच घोंगडी विणण्यापूर्वीच आम्ही लोकरीच्या धाग्यांना खळ देत असल्याने आमच्या घोंगड्या राठ किंवा अत्यंत खरबडीत तयार होत नाहीत. तसेच मुळात जावळाची लोकर हि अत्यंत कमी प्रमाणात उबलब्ध होत असल्याने तिच्यापासून घोंगड्या जास्त बनवल्या जात नाहीत.

 

घोंगडी धुता येते का?

पारंपारिक घोंगडी कधीही धुतली जात नाही. घोंगडी हि लोकरीची बनलेली असते, लोकर नैसर्गिकरीत्या धुळीमुळे मळत नाही. (Wool is naturally resistant to dust). त्यामुळे घोंगडी ला 15 दिवसांतून 2 ते 3 तास झटकून उन्हात वाळू घातल्यास घोंगडी पूर्वरत स्वच्छ होते. घोंगडी वर चहा, कॉफी व चिकट द्रव काही पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये घोंगडी कधीही धुवू नये, आवश्यकता वाटल्यास ड्राय क्लिनिंग करू शकता.

 

आपणांस आमची घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही तर?

आपणांस आमची  घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही किंवा आमच्या  घोंगडी ची क्वालिटी आवडली नाही तर आपणांस कोणताही प्रश्न न विचारता 2 दिवसांत आम्ही घोंगडी परत घेऊ. समाधानी ग्राहक हेच आमच्या यशाचे रहस्य आहे. 

 

आमच्या ग्राहकांची Ghongadi.com विषयी प्रतिक्रिया:

 

घोंगडी च्या खरेदीतून आपण ग्रामीण कलाकारांना पाठबळ देत आहात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

 

Size – 4 X 10 Ft. Traditional Pit-loom size

Ghongadi is a traditional woollen blanket made in Maharashtra, India.  Blankets are made on Pit-Loom and dyed with organic and natural dyes.

This blanket has cultural significance in Maharashtra, as it is considered as a holy blanket and used in all the holy rituals and community functions.

On the other side, Ghongadi believed to help acupressure and blood flow. Nomads and shepherds in southern Maharashtra sleep on them in acute back pain and found as a great remedy for themselves.

This Ghongadi is light in weight, soft in feel, Handmade.

Customer Reviews

Based on 4 reviews Write a review

Check COD Availability