Ghongadi.com

Jen - The Woollen Carpet (White)

Sale price Price Rs. 2,850.00 Regular price Rs. 3,650.00

साईझ: 4x6 फूट

किंमत: ₹ 2850/-

डिलिव्हरी वेळ - ऑर्डर दिल्यापासून 15 दिवसांत घरपोच मिळेल 

 

जेन म्हणजे काय? 

जेन किंवा जाजम हे मेंढीच्या लोकरीचे १ इंच जाडीची मऊ पारंपारिक गादी आहे. जेन या पूर्णपणे हाताने बनविलेल्या आहेत. जेन बनविण्यासाठी आम्ही उच्च प्रतीची लोकर वापरतो. आमच्याशी संलग्न कलाकार हे त्यांची पुर्वपारंम्पारिक कला जोपासत जेन तयार करतात आणि जेनच्या डिजाईन या प्रत्येक कलाकारानुसार बदलतात. (त्यामुळे ओर्डेर केल्यानंतर वरील फोटो मधील डिजाईन नेहमी मिळेल याची शाश्वती देता येणार नाही, परंतु आम्ही बनविलेली प्रत्येक जेन हि सुंदरच असेल याची मात्र आम्ही हमी देतो).

महाराष्ट्रात जेन हि प्रामुख्याने सोलापूर-सांगली-कोल्हापूर या भागांत पारंपारिकरित्या बनविली जाते. आज या जिल्ह्यांमधे पारंपरिक पद्धतीने जेन बनविणारे कलाकार हातावर मोजण्याइतपत राहिलेले आहेत. अतिशय मर्यादित स्वरूपात या ओरिजिनल जेन तयार होतात. वेळेनुसार जेनच्या डिजाईन्स आणि कलाकारीत बदल झालेले दिसतात परंतु भूमितीय आकार आणि रान फुले, वेली यांचा संगम मात्र जवळपास सर्व कलाकारींत दिसून येतो.

आमच्या जेन वजनाने हलक्या परंतु टिकाऊ आणि मऊ आहेत. आमचे कलाकार जेन बनविण्यासाठी सर्वोत्तम प्रतीची दख्खनी लोकर वापरतात आणि त्यामुळेच आमच्या जेन चा तुकडा पडत नाही. आमच्या जेन चा तुकडा पडला तर पूर्णपणे जेन बदलून देण्याची 25 वर्षांची ग्यारंटी आम्ही देतो.

 

जेन कसे तयार होते? 
 
सुरुवातीला विविध साच्यांमध्ये हवी ती पानाफुलांची डिजाईन कलाकार तयार करतो. साधारणपणे 7 ते 8 किलो लोकर संपूर्णपणे हाताने लाटली जाते. हि लोकर लाटत या साच्यांमध्ये भरली जाते आणि उन्हामध्ये या जेन ला वाळविले जाते. एक जेन संपूर्णपणे हाताने तयार करण्यासाठी अंदाजे 7 ते 10 दिवस लागतात. या कलाकारांकडे तयार झालेल्या जेन नंतर Ghongadi.com च्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात आणि सर्वोत्तम क्वालिटीच्याच जेन ग्राहकांकडे पाठविल्या जातात 

 

जेन वर झोपल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे 

 • पाठदुखी, मणकेदुखी व कंबरदुखी पासून मुक्ती
 • वात, सांधेदुखी, Spondylosis, Slipped Disc, Arthritis, Spine-Related Problems, CLBP इत्यादी आजारांवर अत्यंत गुणकारी 
 • रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत
 • जेन वर झोपल्याने निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते
 • शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात
 • सकाळी झोपेतून उठल्यानंतर होणाऱ्या अंगदुखी पासून आराम
 • जेन चा समतल आणि मऊ पृष्ठभाग असल्याने पाठीच्या प्रेशर पॉइंट ना सपोर्ट मिळतो
 • वृद्ध तसेच वार्धक्याकडे झुकणारया व्यक्तींसाठी सर्वोत्तम बेडिंग पर्याय

 

आपण Ghongadi.com मधूनच जेन का घ्यावे?
 • संपूर्णपणे हाताने लाटून तयार केलेले लोकरीचे जेन
 • उच्च प्रतीची दख्खनी मेंढीची लोकर आम्ही जेन बनवण्यासाठी वापरतो त्यामुळे आमच्या जेन चा तुकडा पडत नाही
 • जेन चा तुकडा पडला तर पूर्णपणे जेन बदलून देण्याची 25 वर्षांची ग्यारंटी
 • सर्वोत्तम प्रॉडक्ट क्वालिटी, कोणत्याही प्रकारची लोकरीमध्ये भेसळ नाही 
 • ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक जेन आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाते 
 • ग्राहकांच्या वेळेनुसार घरपोच डिलिव्हरी 

 

आपणांस आमची जेन विकत घेतल्यानंतर आवडली नाही तर?

आपणांस आमची जेन विकत घेतल्यानंतर आवडली नाही किंवा आमच्या जेन ची क्वालिटी आवडली नाही तर आपणांस कोणताही प्रश्न न विचारता 2 दिवसांत आम्ही जेन परत घेऊ. समाधानी ग्राहक हेच आमच्या यशाचे रहस्य आहे. 

 

आमच्या ग्राहकांची जेन आणि Ghongadi.com विषयी प्रतिक्रिया:

 

जेन च्या खरेदीतून आपण ग्रामीण कलाकारांना पाठबळ देत आहात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

 

This woolen Durrie (Marathi Name ‘Jaan’ or ‘Jen’) is completely handmade. Woolen threads are woven with superior quality loose sheep wool. Whereas traditional nomad designs and patterns vary from artisan to artisan. Making such durries in Maharashtra is an age-old tradition, the designs are being modified and changed with time but the main aspect of geometrical shapes and nomad motifs remain the same.

These durries are mainly used for health benefits (back and body pain relief) in the villages across western Maharashtra.

These durries are light in weight, soft in feel, Handmade.

Customer Reviews

Based on 5 reviews Write a review

Check COD Availability


People who bought this product, also bought