Ghongadi.com

Sumbran Ghongadi

Sale price Price Rs. 3,150.00 Regular price Rs. 3,650.00

 

साईझ: 4x10 फूट

किंमत: 3150₹ मधे घरपोच मोफत डिलिव्हरी 

डिलिव्हरी वेळ - ऑर्डर दिल्यापासून 15 दिवसांत घरपोच मिळेल 

 

सदाबहार कलेक्शन काय आहे?

सदाबहार कलेक्शन मधे ‘सुंबरान’ आणि ‘मल्हार’ ह्या अतिशय दुर्मिळ असणाऱ्या घोंगड्या आम्ही पुन्हा तयार करत आहोत. खड्डामागावर घोंगडी विणण्याची कला हि सर्वार्थाने मराठी मातीतील लोककला आहे आणि तिला असणारा रांगडा धनगरी बाज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही घोंगडी.कॉम च्या माध्यमातून सदाबहार कलेक्शन आपणापुढे घेवून येत आहोत.

अंदाजे 6 किलो वजन असणाऱ्या या दोन्ही घोंगड्या सुतळी इतक्या जाड असणाऱ्या 100% शुद्ध लोकरीच्या धाग्यांपासून बनवल्या जातात. धनगर समाजातील प्रचलित लोककथांमधून मल्हारी मार्तंड देवाच्या खांद्यावर असणारी घोंगडी हि बारा किलोची असायची, त्या प्रकारच्या अस्सल मानाच्या घोंगड्या बनवणारे कलाकार आजमितीला अस्तित्वात नाहीत परंतु या लोककथांच्या संदर्भाचा अभ्यास करून आणि जुन्या-जाणत्या कलाकारांना भेटून आम्ही अगदी तशाच प्रकारच्या घोंगड्या तयार करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. शुद्ध उबदार लोकरीपासून घरगुती वापरता येतील अशा तयार केलेल्या ‘सुंबरान’ आणि ‘मल्हार’ घोंगडी आमच्या या प्रयत्नांचे यश आहे.  

सुंबरान म्हणजे स्मरण. प्रामुख्याने जेजुरीचा खंडोबा, विडणीचा धुळोबा, आरेवाडीचा बिरोबा या देव-देवतांची आराधना, स्मरण करण्यासाठी मौखिक ओव्या मराठीत म्हटल्या जातात. ओवीच्या सुरवातीला सूर्य, चंद्र, पृथ्वी (जमीन), नद्या, मेघ (ढग) यांना नमन करून कुलदेवतांचे स्मरण केले जाते. ढोल व झांजांच्या तालावर, ठेक्‍यात व ठसक्‍यात या ओव्या गायल्या जातात. या ओव्या गाऊन किंवा कथेच्या रुपात मांडल्या जातात. गावांमध्ये सगळे आबालवृद्ध एकत्र जमून, घोंगडीवर बसून या लोकसंगीताचा आनंद घेतात. हे स्मरण सुंबरान म्हणून मांडले जाते. या लोककथा ग्रामीण जगणं तर मांडतातच परंतु जगण्याचे आदर्श देखील पुढील पिढीला सांगत असतात. अशा समस्त लोककथांचा सोहळा या सुंबरान घोंगडी च्या माध्यमातून घरोघरी पोहोचावा यासाठी संग्रही ठेवावी अशी सुंबरान घोंगडी नवीन स्वरुपात आम्ही आपणापुढे सादर करत आहोत.

 

सुंबरान घोंगडी कशी तयार होते

आमचे कलाकार घोंगडी पारंपारिकपणे खड्डा मागावर विणतात. अतिशय उबदार असलेली सर्वोत्तम दर्जाची लोकर आमचे कलाकार सुंबरान घोंगडी तयार करण्यासाठी वापरतात. खड्डा मागावर लांबीनुसार लोकरीचे सुत लावले जाते. घोंगडी विणताना घोंगडीच्या मधात काळी लोकर आणि दोन्ही बाजूस ठरलेल्या पांढऱ्या लोकरीचे धागे विणले जातात. विणकर एक लय साधत विणायला सुरुवात करतो आणि अंदाजे चार ते पाच दिवसांत एक सुंबरान घोंगडी विणून पूर्ण करतो. संपूर्ण घोंगडी विणून झाल्यानंतर, घोंगडीला शेवटची खळ लावण्यात येते. या कलाकारांकडे तयार झालेल्या घोंगडी नंतर Ghongadi.com च्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात आणि सर्वोत्तम क्वालिटीच्याच घोंगडी ग्राहकांकडे पाठविल्या जातात.

  

 

सुंबरान घोंगडी वर झोपल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे:

  • पाठदुखी, मणकेदुखी व कंबरदुखी पासून मुक्ती
  • वात, सांधेदुखी, Spondylosis, Slipped Disc, Arthritis, Spine-Related Problems, CLBP इत्यादी आजारांवर अत्यंत गुणकारी 
  • रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत
  • घोंगडी वर झोपल्याने निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते
  • शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात
  • सकाळी झोपेतून उठल्यानंतर होणाऱ्या अंगदुखी पासून आराम
  • योगा, ध्यानधारणा, बैठक व साधनेच्या सफल पूर्ततेसाठी उपयुक्त
  • तळी-भंडारा, जागरण गोंधळ, सत्यनारायण तसेच विविध वैदिक विधी व कार्यक्रमात घोंगडीला मोलाचा मान

 

 आपण Ghongadi.com मधूनच घोंगडी का घ्यावी?

  • संपूर्णपणे हाताने पारंपारिक पद्धतीने गावांमधे तयार केलेली घोंगडी 
  • उच्च प्रतीची दख्खनी मेंढीची लोकर आम्ही घोंगडी बनवण्यासाठी वापरतो 
  • सर्वोत्तम प्रॉडक्ट क्वालिटी, कोणत्याही प्रकारची लोकरीमध्ये भेसळ नाही 
  • संपूर्ण महाराष्ट्रात खड्डा मागावरील ओरिजिनल घोंगडी देणारा Ghongadi.com हा एकमेव ब्र्यांड 
  • थेट ग्रामीण कलाकार ते ग्राहक, आपण विकत घेत असलेल्या घोंगडी मागील नफ्यातील मोठा हिस्सा हा थेट कलाकारांना दिला जातो 
  • ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक घोंगडी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाते 
  • ग्राहकांच्या वेळेनुसार घरपोच डिलिव्हरी 

 

सुंबरान घोंगडी आणि नेहमीच्या काळ्या घोंगडी मधे काय फरक आहे?

सुंबरान घोंगडी आणि नेहमीची काळी घोंगडी या दोन्ही घोंगड्या एकाच गुणवत्तेच्या लोकरीपासून तयार होतात. सुंबरान घोंगडी हि कसरी रंगाच्या (Brownish in color) लोकरीपासून तयार होते. नेहमीची घोंगडी हि वजनाने हलकी आहे (अंदाजे वजन दोन किलो), प्रवासात सहजपणे घेवून जाता येतील अशा प्रकारे हलक्या घोंगडीची मागणी असल्याने तुलनेत मऊ अशा नेहमीच्या घोंगडी आहेत तसेच सुंबरान घोंगडी तुलनेत जाड आणि वजनदार आहे (अंदाजे वजन सहा किलो), सुंबरान घोंगडी हि सुतळी इतक्या जाड लोकरीच्या धाग्यांपासून तयार केली जाते. जाड लोकरीचे धागे वापरल्याने सुंबरान घोंगडी हि नेहमीच्या घोंगडी पेक्षा तुलनेत जास्त उबदार आहे. सुंबरान घोंगडी तयार करणे हे अतिशय कष्टदायक असल्याने ह्या घोंगडी दुर्मिळ झालेल्या आहेत. कंबरदुखी, पाठदुखी आणि मनकेदुखीवर रामबाण इलाज देणारी उबदार अशी सुंबरान घोंगडी आहे.       

 

सुंबरान घोंगडी जावळाची आहे का? जावळाची घोंगडी म्हणजे काय?

मेंढी च्या पहिल्या कात्रनीच्या लोकरीला जावळाची लोकर म्हणतात. जावळाची लोकर हि तुलनेत जास्त मऊ असते. परंतु सध्या आम्ही वापरत असलेली लोकर हि अत्यंत चांगल्या प्रतीची असून जावळाच्या लोकरी प्रमाणेच मऊ आहे. तसेच घोंगडी विणण्यापूर्वीच आम्ही लोकरीच्या धाग्यांना खळ देत असल्याने आमच्या घोंगड्या राठ किंवा अत्यंत खरबडीत तयार होत नाहीत. तसेच मुळात जावळाची लोकर हि अत्यंत कमी प्रमाणात उबलब्ध होत असल्याने तिच्यापासून घोंगड्या जास्त बनवल्या जात नाहीत.

 

घोंगडी धुता येते का?

पारंपारिक घोंगडी कधीही धुतली जात नाही. घोंगडी हि लोकरीची बनलेली असते, लोकर नैसर्गिकरीत्या धुळीमुळे मळत नाही. (Wool is naturally resistant to dust). त्यामुळे घोंगडी ला 15 दिवसांतून 2 ते 3 तास झटकून उन्हात वाळू घातल्यास घोंगडी पूर्वरत स्वच्छ होते. घोंगडी वर चहा, कॉफी व चिकट द्रव काही पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये घोंगडी कधीही धुवू नये, आवश्यकता वाटल्यास ड्राय क्लिनिंग करू शकता.

 

आपणांस आमची घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही तर?

आपणांस आमची  घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही किंवा आमच्या  घोंगडी ची क्वालिटी आवडली नाही तर आपणांस कोणताही प्रश्न न विचारता 2 दिवसांत आम्ही घोंगडी परत घेऊ. समाधानी ग्राहक हेच आमच्या यशाचे रहस्य आहे. 

 

आमच्या ग्राहकांची Ghongadi.com विषयी प्रतिक्रिया:

 

 

घोंगडी च्या खरेदीतून आपण ग्रामीण कलाकारांना पाठबळ देत आहात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

 

Size – 4 X 10 Ft. Traditional Pit-loom size

Ghongadi is a traditional woolen blanket made in Maharashtra, India.  Blankets are made on Pit-Loom and dyed with organic and natural dyes.

This blanket has cultural significance in Maharashtra, as it is considered as a holy blanket and used in all the holy rituals and community functions.

On the other side, Ghongadi believed to help acupressure and blood flow. Nomads and shepherds in southern Maharashtra sleep on them in acute back pain and found as a great remedy for themselves.

This Ghongadi is light in weight, soft in feel, Handmade.

 

 

Check COD Availability